कृषी विभागातील उपकृषी अधीकारी भरत गायकवाड यांना भावपूर्ण निरोप

कोंढाण – कृषी विभागात उपकृषी अधीकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावलेले सामाजिक कार्यकर्ते आयु. भरत माधव गायकवाड यांचा निरोप समारंभ त्यांच्या मूळ गावी कोंढाण येथे अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून गायकवाड यांच्या कार्याचा गौरव केला. रिपाईचे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी आपल्या भाषणात गायकवाड यांनी शेतकरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी केलेल्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी रिपाईचे सचिव सोमनाथ धनगवकर, श्यामराव खरात, मनोर येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर गायकवाड, चरण गायकवाड, कृषी विभागातील अधिकारी, पोलीस अधिकारी बापू, तसेच भरत गायकवाड यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, दीपेश गायकवाड, विशाल पटेल यांसह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात उपस्थित मान्यवरांनी गायकवाड यांच्या प्रामाणिक सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि समाजातील योगदानाचे कौतुक केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून कृषी क्षेत्रात मोलाची भर घातल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानत, मिळालेल्या सहकार्यामुळेच आपल्याला यशस्वीपणे कार्य करता आले, अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button