पालघर नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत घरकुल सर्वेक्षण व नोंदणीला गती

पालघर :
पालघर नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व गरजू व पात्र नागरिकांसाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत नविन घरकुल मंजुरीसाठी ऑनलाइन सर्वेक्षण व नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर पात्रता तपासून ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन पालघर नगरपरिषदेने केले आहे.
लाभार्थ्यांनी https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PMAY_SURVEY/EligibilityCheck.aspx या संकेतस्थळावर जाऊन आपली पात्रता तपासून अर्ज करावा. विशेषतः BLC – स्वतःच्या जागेवरील घरकुल या घटकांतर्गत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.
आवश्यक कागदपत्रे
स्वतःच्या जागेचे मालकी हक्काचे कागदपत्र, चालू वर्षाचा उत्पन्न दाखला, अर्जदार व कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड (मोबाईल क्रमांक संलग्न), घरपट्टी उतारा, शिधापत्रिका तसेच चालू व मागील तीन वर्षांची मालमत्ता कर भरल्याची पावती आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
पात्रतेचे निकष
लाभार्थी व कुटुंबातील कोणाच्याही नावावर पक्के घर नसावे.
मागील २० वर्षांत कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
वार्षिक उत्पन्न मर्यादा कमाल ३ लाख रुपये असावी.
ऑनलाइन नोंदणी पूर्ण केल्यानंतर संबंधित सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती पालघर नगरपरिषदेच्या कार्यालयात जमा कराव्या लागणार आहेत. योजनेसंदर्भात अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी प्रधानमंत्री आवास योजना CLTC कक्ष येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मदत कक्ष/संपर्क : तेजस संधे (CLTC Engineer)
पालघर नगरपरिषदेच्या या उपक्रमामुळे शहरातील गरजू नागरिकांना स्वहक्काचे घर मिळण्याचा मार्ग सुकर होणार असून अधिकाधिक पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी, पालघर नगरपरिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

One thought on “पालघर नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत घरकुल सर्वेक्षण व नोंदणीला गती

  1. Brapub? Heard of it. Website looks clean enough. I poked around a bit and seems like a pretty decent platform. Might be worth a look if you’re searching for something new. brapub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button