
पालघर, दि. १७ ऑक्टोबर २०२५ — दिवाळीच्या मंगलप्रसंगी तणासी खरे पाडा येथील असंख्य महिलांनी शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश करून नवसंजीवनीचा संदेश दिला. हा पक्षप्रवेश सोहळा पालघर येथील राजयोग शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.
या पक्षप्रवेशीय कार्यक्रमास शिवसेना महिला सौ.शुभांगी पाटील यांचा पुढाकाराने संबंधित पक्ष प्रवेश शक्य झाला.या कार्यक्रमात उपस्थित माननीय जिल्हाप्रमुख श्री. कुंदन संखे, शिवसेना उपनेत्या सौ. ज्योती मेहेर माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सौ. भारती कांबडी पालघर विधानसभा संघटक श्री. रवी चौधरी (आप्पा ) व शहर संघटिका सविता मल्लाह यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांनी पक्षप्रवेश केला…
कार्यक्रमादरम्यान महिलांना पक्षाची भगवी ओढणी देऊन स्वागत करण्यात आले. वक्त्यांनी महिलांच्या राजकारणातील सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत, समाजकारणात सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले.
जिल्हाप्रमुख श्री. कुंदन संखे यांनी सांगितले की,
“या भगिनींच्या सहभागामुळे शिवसेनेची ताकद गावपातळीवर अधिक मजबूत होईल. महिलांच्या सक्रिय सहभागामुळे समाजात परिवर्तनाचा मार्ग अधिक वेगाने खुला होईल.”
उपनेत्या ज्योती मेहेर यांनी नव्या सदस्यांचे स्वागत करत सांगितले की या प्रसंगी सर्व नव्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

Howdy folks! Giving bet118 a try. Heard it’s got some good offers. Wish me luck, and maybe I’ll see you raking in the dough! Find it here: bet118