भव्य सोहळ्यात उमरोलीत नवीन बौद्ध विहाराचे उद्घाटन

उमरोली (आंबेडकर नगर), दि. 1 मे 2026 — बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने उमरोली येथील आंबेडकर नगरमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या बौद्ध विहाराचे भव्य उद्घाटन मा. श्री राजेंद्र गावित यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या सोहळ्याला मोठ्या संख्येने बौद्ध बांधव आणि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, उमरोलीचे सरपंच प्रभाकर पाटील, बहुजन विकास आघाडीचे समन्वयक प्रशांत पाटील, उद्योजक संखे, डहाणू-पालघर बौद्ध युवक मंडळाचे अध्यक्ष विनोद जी मोरे, उपसरपंच माळी, उमरोली बौद्ध युवक मंडळाचे अध्यक्ष जयवंत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच भन्ते करुणा निधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. सामाजिक कार्यकर्ते छबीलदास गायकवाड, अॅडव्होकेट निखिल राऊत, अजिंक्य मस्के, शांताराम मोरे, विशाल मोरे, जगन्नाथ गायकवाड, माजी नगरसेवक संजय गायकवाड, उमेश राऊत आदी मान्यवरांनीही कार्यक्रमास हजेरी लावली.
उमरोली, बिरवाडी, पंचली, पालघर, आंबोडे व परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने बौद्ध बांधव व भगिनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
नवीन बौद्ध विहाराच्या उभारणीमुळे परिसरातील नागरिकांना धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध होणार असून, यामुळे बौद्ध समाजाच्या एकतेला आणि प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button