बांद्रा (पूर्व) येथे “बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची” कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई प्रतिनिधी : प्रीती गडा

मुंबई, दि. ९ नोव्हेंबर :
उत्तर मध्य मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित “बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची” या भव्य कार्यक्रमाला बांद्रा (पूर्व) येथील कोलगेट मैदानावर महिलांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सायंकाळी पार पडलेल्या या सोहळ्यात सुमारे पाच हजारांहून अधिक भगिनींनी उपस्थिती दर्शवली, त्यामुळे संपूर्ण परिसर भगिनींच्या उत्साहाने दुमदुमला होता.

महिला सक्षमीकरण, सामाजिक ऐक्य आणि भाजपा महिला मोर्चा कार्यकर्त्यांमधील एकात्मता वृद्धिंगत करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते. कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे, प्रेरणादायी भाषणे आणि कार्यकर्त्यांच्या गौरवाचा सोहळा यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री व उत्तर मध्य मुंबईचे पालकमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम, पारग अडवाणी, अ‍ॅड. उज्ज्वल निकम, तसेच उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उत्तर मध्य मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.स्वप्ना वीरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

मान्यवरांनी आपल्या भाषणातून महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करताना महिलांच्या संघटनशक्तीचे आणि समाजातील त्यांच्या प्रभावी भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे भगिनींमधील एकात्मता वाढीस लागते आणि समाजातील परिवर्तनाचे नेतृत्व महिलांच्या हातात येते.

कार्यक्रमादरम्यान महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी, नृत्य-गीत सादरीकरणे आणि संवाद सत्रांद्वारे भाजपा परिवारातील एकता आणि भगिनीभावाचे दर्शन घडवले. कार्यक्रमाचे यश हे महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या नियोजनशक्ती, टीमवर्क आणि समर्पणाचे प्रतीक ठरले.

उपस्थित महिलांना साडी वाटप करण्यात आले, तसेच कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

शेवटी, महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व उपस्थित भगिनींचे मनःपूर्वक आभार मानले.
“बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची” हा उपक्रम महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सलोख्याच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल ठरल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.


One thought on “बांद्रा (पूर्व) येथे “बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची” कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button