बोईसर वर्षा मॅरेथॉनला धावपटूंचा प्रचंड प्रतिसाद; पालघर ट्रॅफिक पोलिसांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धा निर्विघ्न पार

बोईसर, पालघर (विशेष प्रतिनिधी):

बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘बोईसर वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत तब्बल ७ ते ८ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मुख्य रस्त्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झालेली असतानाही, कोणताही अनुचित प्रकार घडू न देता वाहतूक व्यवस्था अत्यंत सुरळीत ठेवण्याचे आव्हान पालघर ट्रॅफिक पोलिसांनी कौशल्याने पेलले.
​विविध गटांत हजारो धावपटूंचा उत्साह
आधार प्रतिष्ठानतर्फे आयोजित या मॅरेथॉनमध्ये ११ किमी, ६ किमी, ५ किमी, ३ किमी आणि १ किमी या अंतरांच्या शर्यतींसह ज्येष्ठ नागरिक आणि कपल (दांपत्य) स्पर्धा अशा विविध गटांचा समावेश होता. विविध भागांतून आलेल्या ७ ते ८ हजार धावपटूंमुळे बोईसर परिसरात मोठी गर्दी झाली होती.

​वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व चोख नेतृत्व
मॅरेथॉन सुरळीत पार पडावी यासाठी पालघर पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे कडक व नियोजनबद्ध आखणी करण्यात आली होती:
​मार्गदर्शक अधिकारी: मा. पोलीस अधीक्षक (SP) यतीन देशमुख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक (Addl. SP) विनायक नरळे आणि मा. होम डीवायएसपी (Home DySP) रवींद्र नाईक .

​प्रत्यक्ष नेतृत्व व नियोजन: ट्रॅफिक प्रभारी अधिकारी ए.पी.आय. (API) श्री अनिल व्हटकर यांच्या प्रत्यक्ष व आक्रमक नेतृत्वाखाली संपूर्ण मॅरेथॉन मार्गावरील वाहतुकीचे यशस्वी नियंत्रण करण्यात आले.

​अहोरात्र कर्तव्य बजावणारी पोलिसांची टीम
या बंदोबस्तात ट्रॅफिक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत सतर्कतेने आपली

जबाबदारी पार पाडली. यामध्ये:

​पी.एस.आय. (PSI) बासू पवार

​श्रेणी पी.एस.आय. खैरनार

​पोलीस हवालदार संख्ये

​पोलीस अंमलदार करपे

​पोलीस अंमलदार संतोष साळुंखे

​पोलीस अंमलदार सोनकांबळे

​पोलीस अंमलदार बोराडे

​पोलीस अंमलदार कुलाल

​पोलीस अंमलदार केदार

​या संपूर्ण टीमने मैदानावर व मुख्य रस्त्यांवर तैनात राहून वाहतुकीचा कोणताही खोळंबा होऊ दिला नाही.

​नागरिकांकडून ट्रॅफिक पोलिसांचे कौतुक
मॅरेथॉन मार्गावर पोलिसांची प्रभावी तैनाती, वाहतूक नियंत्रण आणि स्पर्धकांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजनांमुळे रहदारी सतत सुरू राहिली. एवढ्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात शिस्त, सुरक्षितता आणि वाहतूक नियंत्रण यांचा उत्कृष्ट समन्वय साधल्याबद्दल पालघर ट्रॅफिक पोलीस दलाचे आणि अधिकाऱ्यांचे बोईसरवासीयांकडून व नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.

,,L

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button