
पालघर | प्रतिनिधी :
पोलीस अधीक्षक यतीन देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय. अनिल व्हटकर यांचे प्रभावी नियोजन
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा पोलिस दल व पालघर वाहतूक विभागाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्यासाठी उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध बंदोबस्त करण्यात आला आहे. शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून पालघर शहरातील प्रमुख ठिकाणी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच होमगार्ड जवान तैनात करण्यात आले आहेत.
पालघरचे पोलीस अधीक्षक यतीन देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष बंदोबस्त करण्यात आला असून, प्रत्यक्ष नेतृत्व व वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी पालघर ट्रॅफिक विभागाचे प्रभारी अधिकारी ए.पी.आय. अनिल व्हटकर यांनी प्रभावीपणे सांभाळली आहे.
दहीहंडी उत्सवाच्या काळात शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने शिवसेना कार्यालय चौक, जगदंबा नाका, पाचबत्ती नाका तसेच पालघर रेल्वे स्टेशन परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे, या उद्देशाने प्रत्येक ठिकाणी स्वतंत्रपणे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना ऑफिस चाररस्ता येथे विशेष बंदोबस्त
शिवसेना ऑफिस चाररस्ता परिसरात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजय प्रभाकर चौधरी, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ चंदर कराटे, पोलीस शिपाई शिवा राठोड, पोलीस शिपाई बाळू तान्हाजी केदार, पोलीस शिपाई सोयेब अब्दुल अजीज शेख तसेच महिला पोलीस शिपाई सुवर्णा सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जगदंबा नाका येथे स्वतंत्र पोलीस पथक
जगदंबा नाका परिसरातील बंदोबस्तासाठी पोलीस उपनिरीक्षक बासु पवार, पोलीस हवालदार पांडुरंग नारायण घोडे, पोलीस हवालदार नारायण लहु धोंगडे, पोलीस शिपाई सचिन सदाशिव गिरी तसेच पोलीस शिपाई योगेश विजय कमलेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पाचबत्ती नाका येथे वाहतूक नियंत्रणावर विशेष भर
शहरातील महत्त्वाच्या पाचबत्ती नाका परिसरात वाहतूक आणि गर्दी नियंत्रणासाठी सहाय्यक फौजदार निलेश पाटील व सहाय्यक फौजदार विनोद धोडी यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
रेल्वे स्टेशन परिसरातही कडेकोट सुरक्षा
पालघर रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांची व प्रवाशांची मोठी वर्दळ लक्षात घेऊन महिला पोलीस हवालदार सुरेखा वांगड व पोलीस शिपाई समीर बाळासाहेब वाळुंज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दहीहंडी उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा तसेच नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पालघर पोलिसांनी सर्वंकष नियोजन केले आहे. प्रमुख चौक, रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणांवर पोलीस व वाहतूक विभागाचे कर्मचारी सतर्क ठेवण्यात आले असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक यतीन देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ए.पी.आय. अनिल व्हटकर यांच्या प्रत्यक्ष नियोजनामुळे पालघर शहरातील दहीहंडी उत्सवासाठी प्रभावी, कडेकोट आणि नियोजनबद्ध सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करून वाहतूक नियमांचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी शिस्त राखावी आणि दहीहंडी उत्सव शांतता व सुरक्षिततेच्या वातावरणात साजरा करावा, असे आवाहन पालघर पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.