
शनिवार दि. २० जुलै २०२४ रोजी रिपाई (आ )पालघर जिल्हा, सर्व तालुका, महिला, युवा कार्यकारणीची महत्वाची बैठक पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आयु. सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली लायन्स क्लब एसी हॉल कचेरी रोड,पालघर येथे पार पडली. यावेळी पक्ष संघटना मजबूत करणे येणाऱ्या काळात पालघर जिल्ह्यामध्ये भव्य मेळावा घेण्याचे संकेत मा. जिल्हाध्यक्षांनी दिले तसेच गाव तिथे शाखा ही संकल्पना राबवित गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. रामदास आठवले साहेब (सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार )यांच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यासह पालघर तालुका सक्षम करण्यासाठी आम्ही कंबर कसली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामीण भागात शालेपयोगी (वह्या, पेन, पेन्सिल, शॉपनर, खोडरबर, कलर पेटी इत्यादी किट )वस्तूचे वाटप, मेडिकल कॅम्प चे आयोजन बऱ्याच ठिकाणी राबविण्यात आले. आमचा शिक्षण व आरोग्यावर जास्त भर असून त्याचा लाभ जिल्ह्यातील दुर्लभ असलेल्या गावाला मोठ्या प्रमाणात होत आहे.यापुढे यापेक्षा जास्तीत जास्त प्रमाणात पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात तळागळातील लोकांपर्यंत ही सेवा पोहचावी असा रिपाई चा संकल्प आहे असे प्रतिपादन आयु.सुरेश जाधव यांनी केले.
यावेळी मोठ्या प्रमाणात कातकरी समाज,आदिवासी समाज,बहुजन समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. आयु.वर्षा काटेला (पालघर जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी अनुसूचित जमाती सेल ) साधना सावरा ( पा.जि. उपाध्यक्षा महिला आघाडी अनुसूचित जमाती सेल )विमल चौधरी (पा. जि.उपाध्यक्षा महिला आघाडी ) संजोग उपाध्याय (पा. जि.महिला आघाडी संघटक) नरेंद्र करणकाळे (पालघर तालुका अध्यक्ष) जागृत जाधव (पालघर तालुका उपाध्यक्ष)कल्पेश पाटील (पा.ता. युवा उपाध्यक्ष) अनिल शिरसाट (पा.ता.युवा उपाध्यक्ष) सुमन दुबळा (पा.ता.उपाध्यक्षा महिला आघाडी अनुसूचित जमाती सेल )सुरेखा नम (पा. ता. सह संघटक महिला आघाडी) हर्षला धानवा (पा. ता.संघटक अनुसूचित जमाती सेल महिला आघाडी) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी आयु.सुरेश जाधव (पालघर जिल्हा अध्यक्ष) रामराव तायडे (पा जि .कार्याध्यक्ष )सोमनाथ धनगावकर (पा. जि. सचिव )प्रकाश साळवी (पा. जि.उपाध्यक्ष )नवीन भाई त्रिपाठी (पा. जि.उपाध्यक्ष) नासिर अन्सारी( पा. जि. संघटक) पुष्पराज फुलारा (पा. जि.संघटक )जब्बार सोलंकी, शरद जाधव (पालघर तालुका युवा अध्यक्ष ) राम ठाकूर (युवा उपाध्यक्ष पा. ता.) सचिन घाडीगावकर (युवा संघटक पा. ता.) दिपेश गायकवाड (युवा कार्यकर्ते पा. ता.)इत्यादी प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.