
पालघर दि. ३० : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प. डहाणू अंतर्गत 33 शासकीय व 21 अनुदानित आश्रमशाळा असुन त्यामध्ये सुमारे 31 हजार 800 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेण्याची संधी मिळणे हे त्यांच्यासाठी स्वप्नासारखेच आहे . विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देऊन आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी सुध्दा कुठल्याच क्षेत्रात मागे नसल्याची जाणीव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी संजीता महापात्र. यांनी करून दिली . या दौऱ्यासाठी शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील इ. 12 वी विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्याची निवड करून त्यांना इस्त्रोच्या शास्त्रज्ञाची भेट घेण्याची संधी उपलब्ध करुन देत अनोखी भेट दिली. भारताने चांद्रयान -3 चे यशस्वी सॉफ्ट लॅडींग चंद्राच्या दक्षिण धृवावर करुन जगामध्ये इतिहास निर्माण केला. दक्षिण धृवावर सॉफ्ट लॅडींग करणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे. यामुळे देशात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. त्याचा अनुभव आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळावा. विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी आश्रमशाळेतील विद्यार्थी इस्त्रोला भेट देणार आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प. डहाणू अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील 26 विद्यार्थी इस्त्रो सेंटर व बँगलोर दर्शन करण्यासाठी दि.29.11.2023 ते दि.2.12.2023 या दरम्यान रवाना होणार असुन त्याठीकाणी भेट देवुन त्या ठीकाणाची माहिती घेणार आहेत.
. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बाहेरील जगाची ओळख व्हावी. त्यांच्या ज्ञानात भर पडावी, विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी व नवीन तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी. भविष्यात आश्रमशाळेतुन सुध्दा वैज्ञानिक तयार व्हावेत या उदात्त हेतुने नाविन्यपुर्णयोजना आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासाठी मंजुर करुन घेण्यात आलेली आहे. विद्यार्थी पहिल्यांदाच रेल्वेने प्रवास करीत असल्याने त्याचा आनंद विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. .”