पालघर नगरपरिषदेत प्रभाग ६ व १ मधील नगरसेवकांच्या कामाची चर्चा

पालघर : पालघर नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये विकासकामांचा वेग मंदावल्याची नागरिकांकडून तक्रार होत असताना, प्रभाग क्रमांक ६ मधील नगरसेवक रईस खान आणि प्रभाग क्रमांक १ मधील नगरसेवक आरिफ कलाडिया यांच्या कामाची मात्र नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविणे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती तसेच स्थानिक अडचणींवर लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करण्याचा प्रयत्न या दोन्ही नगरसेवकांकडून केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक रहिवाशांच्या मते, प्रभाग क्रमांक ६ आणि प्रभाग क्रमांक १ मध्ये नियमित पाहणी, नागरिकांशी संवाद आणि तक्रारींचे जलद निवारण होत असल्याने या दोन्ही प्रभागांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे नगरसेवक रईस खान व आरिफ कलाडिया यांच्या कामाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
दरम्यान, इतर काही प्रभागांमध्ये अपेक्षित प्रमाणात विकासकामे होत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत असून संबंधित नगरसेवकांनीही आपल्या प्रभागातील समस्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
नगरपरिषद क्षेत्रातील सर्व प्रभागांमध्ये समान गतीने विकासकामे व्हावीत आणि नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button