नागरीकांनी मतदानाचा हक्क बजवावा—-जिल्हाधिकारी गोविंद बोडके

पालघर दि. 28 : लोकसभेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. पालघर लोकसभा मतदार संघातील सर्व नागरीकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केल.
स. तु. कदम विद्यालय येथे SVEEP Activity अंतर्गत मतदान जनजागृती, लोकशाहीतील सहभाग, मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने विद्यार्थ्यांनी देशाचा नकाशा मानवी रांगोळी (150 फूट बाय 130 फूट) तयार करण्यात आला होता. जवळपास 700 विद्यार्थ्यांच्या सहभागाने हा नकाशा तयार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके बोलत होते.
यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया जाधव, तहसीलदार रमेश शेंडगे, जीवन विकास संस्थेचे कार्याधक्ष वाघेश कदम व बोईसर पालघर परिसरातील महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, पत्रकार बंधु व इतर मान्यवर उपस्थित होते.
मे महिना हा विद्यार्थ्यांसाठी सुट्टीचा महिना असल्याने विविध कौटुंबिक कार्यक्रम या महिन्यामध्ये आयोजित करण्यात येतात. या मध्ये मतदानासाठी वेळ काढून नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य द्यावे. शिक्षक वर्गांनी सुध्दा मतदान करण्याविषयी महाविद्यालयातून जनजागृती करून पालघर लोकसभेतील मतदानाची टक्केवारी वाढवावी. लोकशाहीचा महत्वाचा टप्पा मतदान करणे हा आहे. SVEEP Activity अंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी मतदार जनजागृती करण्यात येणार आहे. यामुळे निश्चितच पालघर मतदार संघातील मतदान 80 टक्केच्या वरती जाईल असा विश्वासही जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button