
दि.०४/०१/२०२४ रोजी पालघर जिल्ह्या रिपाई (आ )चे जिल्हाध्यक्ष आयु. सुरेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मुकबधिर विद्यालय, पालघर येथील ९० विद्यार्थ्याना युवा आघाडी पालघर च्या वतीने फळे वाटप करण्यात आली . तसेच वाढदिवसाचे अवचित्त साधुन पालघर शहरातील गोठणपूर प्रभाग क्र. १ येथे रिपाई च्या शाखेचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. कार्यकर्त्यानी कार्यालयात केक कापुन, महाहार घालून, पुष्पगुछ देऊन जाधव साहेबांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. यावेळी रिपाई चे ठाणे -पालघर जिल्हा पक्ष निरीक्षक,नेते मा. श्री. सुरेश (दादा )बारशिंगे साहेब, जिल्ह्याचे उपाध्यक्ष कुंदन मोरे,पालघर तालुका अध्यक्ष अँड. अहमद भिमाणी, महिला तालुका अध्यक्षा तृप्ती मोरे, युवा तालुका अध्यक्ष शरद जाधव, उपाध्यक्ष राम ठाकुर, उपाध्यक्ष जागृत जाधव, तसेच शिवसेना शिंदेगटाचे प्रमुख कार्यकर्ते व महिला पदाधिकारी, मनसेचे पालघर जिल्हा सचिव आयु. दिनेश गवई, आयु. विनय आघाव , संकेत वरठा, पालघर तालुका संघटक राकेश जाधव, दिपेश गायकवाड, संतुलाल मल्ला (बजरंग दलाचे जेष्ठ कार्यकर्ते) , धनश्री जाधव, पालघर तालुका युवा उपाध्यक्ष रुपेश लोखंडे, सुनिल गायकवाड, अँड. संदिप जाधव, वर्षा काटेला, मनिषा मोरे, विजेंद्र ठाकुर, (पालघर जिल्हा युवा कार्याध्यक्ष), चेतन पाटील , संजय गाडगे,पालघर जिल्ह्यातील वकील संघटनेचे पदाधिकारी अँड. निखिल राउत, अँड. पावडे, अँड. प्रतिक परटोले , अँड. अजिंक्य मस्के , संजय जाधव, पुष्पाकर गायकवाड, प्रशांत तांबे,कल्पेश जाधव (ग्रामपंचायत सदस्य), भरत पांचाल व इतर अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

