
पालघर, दि. ७ ऑक्टोबर २०२५:
दिल्ली येथे दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी भारताचे सरन्यायाधीश आदरणीय श्री. भूषण रा. गवई यांच्यावर एका माथेफिरू वकील, श्री. राकेश किशोर, यांनी भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही घटना न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेसाठी गंभीर ठरली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पालघर जिल्हा शाखा ने मा. जिल्हाधिकारी, पालघर यांना निवेदन सादर करून आरोपी वकील आणि इतर संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पक्षाच्या निवेदनात म्हटले आहे की, हा प्रकार केवळ सरन्यायाधीशांवरच नव्हे, तर संपूर्ण न्यायव्यवस्थेवर आणि सार्वजनिक विश्वासावरही परिणाम करणारा आहे. त्यामुळे या घटनेचा गंभीर तपास करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
आयु.सुरेश जाधव (पालघर जिल्हा अध्यक्ष), संजोग उपाध्याय (पालघर जिल्हा संघटक-महिला आघाडी),शरद जाधव (पालघर तालुका अध्यक्ष,युवा),दिपेश गायकवाड (युवा कार्यकर्ता),विशाल पटेल (युवा कार्यकर्ता), राजेश उपाध्याय सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.