
वसई, दि. २१ नोव्हेंबर २०२५ :
वसई विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सुविधा-वाढ, मूलभूत पायाभूत सोयींचा विकास आणि जीवनमान उंचावण्याच्या दिशेने आज आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले. प्रभाग समिती “आय” अंतर्गत वसई शहरातील विविध परिसरांमध्ये एकूण आठ महत्वाच्या विकासकामांचे भूमिपूजन वसई विधानसभेच्या आमदार मा. सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
या उपक्रमामुळे वसई पश्चिम भागात सुधारित रस्ते, कार्यक्षम जलनिस्सारण व्यवस्था, सुरक्षित व सुलभ वाहतूक मार्ग आणि स्वच्छ पर्यावरण निर्माण होणार आहे. वसईच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा हा उपक्रम नागरिकांच्या दीर्घकालीन अपेक्षांना सकारात्मक प्रतिसाद देणारा ठरला आहे.
आज भूमिपूजन केलेली प्रमुख विकासकामे :
- पापडी पोलीस चौकी ते पाण्याची टाकी रस्ता तयार करणे
- किरवली स्मशानभूमी ते वडवली खारपाडा रस्ता बांधकाम
- सविता निवास–रेबेका बिल्डिंग गटार दुरुस्ती व बांधकाम तसेच रेबेका बिल्डिंग–सागर शेत मार्गे सविता निवास पर्यंत रस्ता
- हिंदू कोळी स्मशानभूमी ते समुद्र हॉटेल दरम्यान रस्ता
- वॉर्ड 112 नारळी बाग येथील आदिवासी वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण
- बदामी स्टॉप ते उतळेश्वर तलाव गटारावर स्लॅब टाकणे
- वॉर्ड 103 ढोरकईपाडा येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरण
- वॉर्ड 103 नारदोली पाण्याची टाकी ते नागोबा नगरपर्यंत आर.सी.सी. पाइप गटार बांधकाम
“आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष विकास” — आमदार स्नेहा ताई दुबे पंडित
या प्रसंगी बोलताना आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांनी सांगितले की,
“वसईकरांना जे जे हवे आहे, ते देण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष काम करत आहोत. केवळ आश्वासने देण्यापेक्षा प्रत्यक्ष विकास हा आमचा कार्यमार्ग आहे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि विकसित वसई देणे ही आमची बांधिलकी आहे.”
मान्यवरांची उपस्थिती
या भूमिपूजन सोहळ्यास प्रभाग समिती आय अभियंता श्री. मनोज पाटील, भाजप वसई–विरार शहर जिल्हा सरचिटणीस श्री. बिजेंद्र कुमार, जिल्हा सचिव श्री. नंदकुमार महाजन, वसई शहर मंडळ अध्यक्षा सौ. गीतांजली दरीवाला यांसह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसई विकासाची वाटचाल आणखी वेगवान
या आठ विकासकामांमुळे वसई पश्चिम भागामध्ये पायाभूत सुविधांचे जाळे अधिक मजबूत होणार असून वाहतूक, स्वच्छता, रस्ते आणि जलनिस्सारण व्यवस्थेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे. पुढील काळातही वसई विकासाच्या गतीत अधिक वाढ होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.