नगराध्यक्ष उत्तम घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाचा दणदणीत विजय

सर्व 15 प्रभागांत विजय उमेदवार, पालघरवर शिवसेनेचा भगवा फडकला
पालघर : नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष उत्तम घरत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट)ने ऐतिहासिक आणि दणदणीत विजय मिळवला आहे. पालघर नगरपरिषदेतील सर्व 15 प्रभागांमध्ये शिवसेना शिंदे गट व मित्रपक्षांच्या उमेदवारांनी विजय संपादन करत नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या विकासकामांवर नागरिकांनी विश्वास टाकत सर्व उमेदवारांना स्पष्ट बहुमताने विजयी केले. नगराध्यक्ष उत्तम घरत यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेली विकासाभिमुख धोरणे, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद याचा हा कौल असल्याचे बोलले जात आहे.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
प्रभाग 1अ – प्रियंका राजेंद्र म्हात्रे (शिवसेना)
प्रभाग 1ब – अरिफ कलाडिया (उबाठा)
प्रभाग 2अ – मोना मिश्रा (भाजप)
प्रभाग 2ब – भारती धोत्रे (भाजप)
प्रभाग 3अ – महेश कोती (शिवसेना)
प्रभाग 3ब – कृपा मोरे (भाजप)
प्रभाग 4अ – आनंद राऊत (शिवसेना)
प्रभाग 4ब – प्रीती मोरे (शिवसेना)
प्रभाग 5अ – राजेंद्र पाटील (शिवसेना)
प्रभाग 5ब – पुष्पा जैन (शिवसेना)
प्रभाग 6अ – प्रगती म्हात्रे (भाजप)
प्रभाग 6ब – राईस खान (शिवसेना)
प्रभाग 7अ – ज्योती जाधव (शिवसेना)
प्रभाग 7ब – मुनाफ मेमन (भाजप)
प्रभाग 8अ – राधा मानकामे (उबाठा)
प्रभाग 8ब – राहुल पाटील (उबाठा)
प्रभाग 9अ – मेघा आघाव (शिवसेना)
प्रभाग 9ब – अमोल पाटील (शिवसेना)
प्रभाग 10अ – विभूती चंपानेरकर (शिवसेना)
प्रभाग 10ब – नीलम संखे (शिवसेना)
प्रभाग 11अ – सोनाली शिंदे (भाजप)
प्रभाग 11ब – भावानंद संखे (भाजप)
प्रभाग 12अ – अमिश पिंपळे (भाजप)
प्रभाग 12ब – उज्ज्वला काळे (शिवसेना)
प्रभाग 13अ – चंद्रशेखर वडे (शिवसेना)
प्रभाग 13ब – शिल्पा वाजपेयी (शिवसेना)
प्रभाग 14अ – दिनेश घरत (शिवसेना)
प्रभाग 14ब – गीतांजली माने (शिवसेना)
प्रभाग 15अ – माधुरी सापाटे (शिवसेना)
प्रभाग 15ब – जश्विन घरत (शिवसेना)
विजयानंतर शहरात जल्लोषाचे वातावरण असून, शिवसैनिकांनी फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत आनंद साजरा केला. नगराध्यक्ष उत्तम घरत यांनी नागरिकांचे आभार मानत सांगितले की, “हा विजय विकासाचा, विश्वासाचा आणि पालघरच्या जनतेचा विजय आहे. आगामी काळात पालघरचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने केला जाईल.”
या निकालामुळे पालघर नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाची सत्ता अधिक मजबूत झाली असून, राजकीय वर्तुळात या विजयाची मोठी चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button