प्रभाग क्रमांक सहा विकासाच्या नव्या पर्वाकडे : नगरसेवक रईस खान यांचा ठोस कृती आराखडा, नागरिक सहभागाला प्राधान्य

प्रभाग क्रमांक सहामधून दणदणीत विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवक रईस खान यांनी पदभार स्वीकारताच विकासाला गती देण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी त्यांनी प्रभागातील मूलभूत सुविधा, नागरी समस्या व भविष्यातील विकासकामांचा सखोल अभ्यास करत सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत पाणीपुरवठा, रस्ते व गटार दुरुस्ती, स्वच्छता व्यवस्था, पथदिवे, आरोग्य सेवा, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा तसेच युवकांसाठी क्रीडा, शैक्षणिक व रोजगाराभिमुख उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला. नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून त्यावर कालमर्यादेत उपाययोजना करण्याचा स्पष्ट निर्णय यावेळी घेण्यात आला.
“प्रभाग क्रमांक सहा हा माझा प्रभाग नाही, तर माझे कुटुंब आहे. प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवणे, प्रत्येक समस्येवर वेळेत उपाय करणे आणि कामात पूर्ण पारदर्शकता राखणे हीच माझी कार्यपद्धती असेल,” असे ठाम मत नगरसेवक रईस खान यांनी बैठकीत व्यक्त केले.
येत्या काळात प्रत्येक गल्ली व वॉर्डनिहाय पाहणी दौरे, नागरिक संवाद सभा तसेच विकासकामांचा सार्वजनिक कृती आराखडा जाहीर केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासन, स्थानिक प्रतिनिधी व नागरिक यांच्या सहभागातून प्रभागाला आदर्श व विकसित बनवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी मांडला.
रईस खान यांच्या या कार्यतत्पर आणि लोकाभिमुख भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक सहामधील नागरिकांमध्ये उत्साहाचे व सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, “बोलणारा नव्हे तर काम करणारा लोकप्रतिनिधी” अशी त्यांची ओळख अधिक ठामपणे निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

2 thoughts on “प्रभाग क्रमांक सहा विकासाच्या नव्या पर्वाकडे : नगरसेवक रईस खान यांचा ठोस कृती आराखडा, नागरिक सहभागाला प्राधान्य

  1. Best Politician for the City. Helps people in their needs and very helpful to everyone including Rich to Poor people . Rais Khan is really a good personality not like others politicians..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button