
पालघर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) पालघरच्या वतीने शहरातील शिवाजी चौक व पाचबत्ती येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, महिला उपाध्यक्षा सुप्रिया जाधव, जिल्हा संघटिका संजोग उपाध्याय, नगरसेवक आनंद राऊत, शहर संघटिका पूजा केवट, जिल्हा संघटक राजकुमार यादव, ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश उपाध्याय, युवा कार्यकर्ते दीपेश गायकवाड, रक्षा शर्मा, सतीश व पोलीस अधिकारी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि सुशासनाच्या विचारांची आठवण करून दिली. समाजात एकता, न्याय आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी शिवरायांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान घोषणाबाजी व शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.