आरपीआय आठवले पक्षाचा ६९ वा वर्धापन दिन थाटातनवी मुंबईत राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती; ना. रामदास आठवले यांचे मार्गदर्शन

नवी मुंबई | प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचा ६९ वा वर्धापन दिन ३ ऑक्टोबर २०२६ रोजी नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिन सोहळ्यास महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार माननीय ना. रामदासजी आठवले साहेब यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. पक्षाची संघटनात्मक वाटचाल, सामाजिक न्यायाची भूमिका तसेच आगामी काळातील पक्षाची दिशा याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या सोहळ्यास पक्षाचे सचिव अविनाश मातेकर, प्रमुख मार्गदर्शिका सीमाताई आठवले, केंद्रीय सचिव संघटक सुरेशदादा बारशिंगे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, सचिव गौतम सोनवणे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, शीलाताई गांगुर्डे, बाबा मुस्ताक, चंद्रकांत जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, युवा अध्यक्ष राम जाधव, कार्याध्यक्ष रत्नाकर भालेराव, रामराव तायडे, सचिन भारस्कर, तालुका उपाध्यक्ष राम ठाकूर, रुपेश गायकवाड, सचिन घाडगे, सुनील पाटील, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सुप्रिया जाधव, विमल चौधरी, संघटिका संजय उपाध्ये, मनीषा जाधव, राजेश उपाध्याय, शामराव खरात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्राम ओहल यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील विविध विभागांचे प्रमुख, सर्व जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र कार्यकारिणीचे सदस्य तसेच केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे, पत्रकार काकासाहेब खंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली. पालघर जिल्ह्यातून उपाध्यक्ष कुंदन मोरे, वाडा अध्यक्ष आनंद भोईर, प्रकाश साळवी तसेच ठाणे-पालघर प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे यांनी उपस्थित राहून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

पक्षाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे विष्णुदास भावे नाट्यगृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या संघटनात्मक ताकदीचे दर्शन घडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

↑
error: Content is protected !!
Call Now Button