अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी अमरसिंग { बच्चा भाई} ठाकूर यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ठा कुर. पंकज सिंह यांच्याकडून नियुक्तीपत्र प्रदान; २०२७ पर्यंत कार्यकाळ

पालघर प्रतिनिधी

पालघर : अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी श्री. अमरसिंग { बच्चा भाई} अमलदारसिंग ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून, त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. या नियुक्तीमुळे पालघर जिल्ह्यात महासभेचे संघटनात्मक कार्य अधिक बळकट होण्यासह समाजहिताच्या विविध उपक्रमांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार कुंवर हरिवंश सिंह यांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ठा. पंकज सिंह यांनी अमरसिंग { बच्चा भाई} ठाकूर यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पालघर जिल्ह्यात संघटनेचा विस्तार करणे, समाजातील नागरिकांना संघटनेशी जोडणे आणि क्षत्रिय समाजाच्या हक्क, अधिकार व सन्मानासाठी कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

अमरसिंग { बच्चा भाई } अमलदारसिंग ठाकूर हे पालघर तालुक्यातील वेवर येथील रहिवासी असून, त्यांचा पत्ता कमलावती निवास, साई मंदिर रोड, जीवन ज्योत हॉस्पिटलजवळ, वेवर, पालघर असा आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य करताना संघटनेची ध्येयधोरणे समाजापर्यंत पोहोचवणे, सामाजिक एकोपा वाढवणे, समाजाच्या समस्या जाणून घेणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवणे, अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असेल.

महासभेच्या नियुक्तीपत्रात संघटनेचे हित सर्वोच्च मानून तन, मन आणि धनाने समाजाच्या हक्कांसाठी व अधिकारांसाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रसेवेची भावना जपत संघटनेच्या नियमांचे, शिस्तीचे आणि तत्त्वांचे पालन करून जबाबदारी पार पाडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

अमरसिंग{ बच्चा भाई } ठाकूर यांच्या नियुक्तीमुळे पालघर जिल्ह्यात अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, तसेच संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजातील नागरिकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा, संघटनात्मक एकजूट आणि समाजहिताच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे.

अमरसिंग{ बच्चा भाई} ठाकूर यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

↑
error: Content is protected !!
Call Now Button