रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ ),महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना व राष्ट्रीय बंजारा टायगर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने पालघर येथे संविधान दिन साजरा

सलीम कुरेशी: पालघर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ ),महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना व राष्ट्रीय बंजारा टायगर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने पालघर येथे संविधान दिन साजरा

 संपूर्ण भारत देश संविधान दिन साजरा करीत असताना भारतीय संविधानाचे महत्त्व तसेच जनसामान्य लोकांना दिलेल्या मूलभूत अधिकाराची जाणीव व्हावी या उद्देशाने दरवर्षी  प्रमाणे  रविवार दिनांक २६नोव्हेंबर २०२३ रोजी रिपाई (आ), महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना, राष्ट्रीय बंजारा टायगर्स यांच्या वतीने पालघर शहरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
  २६नोव्हेंबर १९४९ हा भारतीय इतिहासातील खूप मोठा दिवस आहे या दिवशी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न प. पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाची राज्यघटना भारत देशाच्या स्वाधीन केली हा दिवस संविधानाचा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने पालघर शहरात आयोजकांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाला मानवंदना देऊन सामूहिकरीत्या संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणात संविधानाचे महत्त्व काय आहे ते जनतेला सांगून शुभेच्छा दिल्या.


   तसेच २६ नोव्हेंबर  २०१८ रोजी आपल्या भारत देशातील मुंबई येथे अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्यात आपले वीर जवान,पोलीस, व नागरिक हे शहीद झाले. त्यांना पालघर पोलीस ठाणे येथे जाऊन सामूहिक रित्या भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पालघर शहराच्या प्रथम नागरिक माननीय सौ उज्वला काळे( नगराध्यक्ष -पालघर नगर परिषद )श्री. केदार काळे  महाराष्ट्र - राज्य प्रवक्ते(शिवसेना शिंदे गट ) श्री कुंदन संखे जिल्हाध्यक्ष पालघर शिवसेना (शिंदे गट )श्री दत्तात्रेय किंद्रे पोलीस निरीक्षक (पालघर पोलीस स्टेशन ) श्री भावानंद संखे (गटनेता भाजप )तथा (नगरसेवक पानप) श्री प्रवीण मोरे (नगरसेवक) श्री मनोज घरत (शिवसेना नेते ) प्रकाश कुराडे (सामाजिक कार्यकर्ते) श्री नैवेद्य संखे पालघर शहर अध्यक्ष (शिवसेना शिंदे गट) डॉ. नारायणकर  सौ. सरिता ठाकूर पालघर शहर उपसंघटक (शिवसेना शिंदेगट) सौ ज्योती राऊत पालघर शहर उपसंघटक (शिवसेना शिंदे गट) श्री राममनी त्रिपाठी( सुंदरम शाळा ट्रस्टी) विकी संखे, प्रतीक यादव (शिवसेना शिंदे गट) रिपाई (आ) चे श्री.सुरेश जाधव (जिल्हाध्यक्ष पालघर )आयु.सचिन लोखंडे (कार्याध्यक्ष पालघर जिल्हा )नवीन भाई त्रिपाठी (उपाध्यक्ष पालघर जिल्हा )सौ रोहिणी गायकवाड (महिला अध्यक्ष पालघर जिल्हा) सौ संध्या ताई राऊत (महिला कार्याध्यक्ष पालघर जिल्हा) श्री कुंदन मोरे (उपाध्यक्ष पालघर जिल्हा) श्री विजेंद्र ठाकूर (युवा कार्याध्यक्ष पालघर जिल्हा )आयु. शरद जाधव (युवा अध्यक्ष पालघर तालुका) आयु राम ठाकूर( युवा उपाध्यक्ष पालघर तालुका) अहमद भिमानी (पा.ता अध्यक्ष) वर्षा काटेला,तृप्ती मोरे (महिला अध्यक्ष पा.ता.)महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे अध्यक्ष - भाऊसाहेब गुंड,जनरल सेक्रेटरी के.व्ही.नारायणन,राष्ट्रीय बंजारा टायगर चे महाराष्ट्र समन्वयक आयु रवि राठोड ऍड.निखिल राऊत,सुप्रिया जाधव,सुरेखा गायकवाड, अंकिता जाधव,महेश गायकवाड,महेंद्र जाधव,पवन ठाकूर,राजू शेख,बाबू शेख व शेकडो च्या वर कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी आलेल्या कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी चहापाणी व नाश्त्याची  व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती.सदर कार्यक्रम संम्पन्न करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अथक  परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button