
आदिवासी समाजाचा बुलंद आवाज खऱ्या अर्थाने तळागळातील वंचित, पिडीत, शोषित लोकांना प्रवाह झोतात आणणारे आपले संपूर्ण आयुष्य, आदिवासी समाजासाठी, लोक हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःला वाहून घेणारे निसर्गवासी,लोकनेते काळुराम (काका) धोदडे यांची शोकसभा मनोरे येथे मा. ना. रामदासजी आठवले ( सामाजिक न्याय राज्यमंत्री -भारत सरकार ) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सदर कार्यक्रमात भूमीसेना, रिपाई,भाजप, सोबत विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त करताना काळूकाकांच्या आठवणींना उजाळा दिला.
"ज्या ज्या वेळेला पँथरच्या मूवमेंट मध्ये माझ्यावर आलेला प्रसंग बाका
त्या वेळेला माझ्या पाठीमागे उभे राहिले काळुराम काका”
अशी चारोळी या वेळेला शोक व्यक्त करताना आठवले यांनी केली. आपल्या भाषणात काळुराम (काका) हे माझे अनेक वर्षापासूनचे जवळचे मित्र होते. अत्यंत साधा माणूस, भोळा माणूस, स्वभावाने सर्वाना हवाहवा वाटणारा, मनामध्ये कोणताही राग द्वेष न ठेवणारा, स्वच्छ मनाचा माणूस बऱ्याच वेळा आदिवासी- दलित समाजासाठी आम्ही एकत्र काम केले जेव्हा जेव्हा मी मनोर येथे बारसिंग यांच्या पेट्रोल पंपावर यायचो व काकांना माहित पडले की ते मला भेटावयास यायचे. खूप वर्षांपूर्वी जेव्हा चांगले रस्तेही नव्हते, वाहन नव्हती तेव्हा आम्ही मस्तान नाका, मनोर येथे आले असताना काळुराम काकांना भेटायला मस्तान नाका ते कोंढाण (भूमिसेना कार्यालय) पर्यंत पायी जायचो.मराठवाडा विद्यापीठाच्या संघर्षामध्ये काळूराम (काका) हे आमच्या सोबत होते.अशा थोर मोठ्या मनाच्या आणि आपलं उभ आयुष्य आदिवासी समाजासाठी वेचणाऱ्या माणसाच स्मारक झाल पाहिजे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन यावेळी रामदास आठवले ह्यानी केले तसेच काकांच्या अनेक आठवणी ताज्या करून शोक व्यक्त केला व श्रद्धांजली अर्पण केली.
त्यावेळी रिपाईचे सुरेश बारसिंग ,भाजपचे संतोष जनाठे,सुमती जैन,भूमीसेनेचे दत्ताराम करबट,अशोक ठाकरे, मनोर ग्रामपंचायत सरपंच चेतन पाटील, उपसरपंच वंदना चंपानेकर शोकसभा अध्यक्ष सुरेश जाधव,काळुराम काकांचे जुने सहकारी रामभाऊ वाडू व अनेक मान्यवर उपस्थित होते.
सदर शोकसभेचे आयोजन पंचशील मित्र मंडळ व दत्तात्रेय फाउंडेशन यांच्या वतीने सोमनाथ धनगावकर, शामराव खरात, सचिन लोखंडे, शरद जाधव,राम ठाकूर यांनी केले. यावेळी रत्नाकर भालेराव, राम जाधव,विलास शिंदे,नरेंद्र करनकाळे, वर्षा काटेला, आनंद भोईर,हर्षला धानवा,संजोग उपाध्याय, विमल चौधरी, सचिन घाडीगावकर, दीपेश गायकवाड, अनिल शिरसाट यासह अनेक रिपाई पदाधिकारी व कार्यकर्ते महिलावर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
