संविधान दिन अमृत महोत्सव २०२४ कार्यक्रम संपन्न
भारतीय संविधान दिन हा २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान समितीने स्वीकारला होता.त्याचे सदैव स्मरण ठेवून आपल्या सर्वोच्च संविधानाचे जगासमोर लोकशाहीचा नवा आदर्श निर्माण करण्याच्या हेतूने दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय संविधानाचा संविधान दिन व त्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने संविधान अमृत महोत्सव कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पालघर येथे पार पडला.




यावेळी डॉ.आंबेडकर चौक टेंभोडे येथील चौकाला अभिवादन करून सामूहिक रित्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच भारतीय संविधान निर्मितीसाठी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप महत्त्वाचा वाटा होता त्यांचा गौरव करणे,धर्मा-धर्मामध्ये एकता, बंधुता, स्वातंत्र्य, संविधानाची मूल्य रुजविण्यासाठी तळागाळातील जनसामान्यापर्यंत संविधानाचे महत्त्व पटवून देण्याचा व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी पालघर येथील लायन्स क्लब हॉल येथे संविधान दिन अमृत महोत्सव कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला.तसेच २६/११ ला जो मुंबईवर जो भ्याड हल्ला झाला होता त्या हल्ल्यात आपले शहीद झालेले पोलीस बांधव व जवानांना यावेळी त्यांचे स्मरण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रकाश इसनाळकर (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद पालघर ) ह्यांचे संविधानावर मोलाचे मार्गदर्शन लाभले सोबत प्रमुख पाहुणे श्री.पी.जी. वाबळे (समाज कल्याण सहाय्यक उपायुक्त पालघर), डॉ. सौ.उज्वला काळे ( नगराध्यक्षा पालघर नगरपरिषद), श्री.कुंदन संखे (पालघर जिल्हाप्रमुख शिवसेना), ऍड.निखिल राऊत,श्री सुरेश जाधव (पालघर जिल्हा प्रमुख रिपाई आ तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य पालघर जिल्हा ) याच्या सोबत अनेकांनी संविधानावरती मोलाचे मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाला श्री. सुभाष शिंदे (मी वडार महाराष्ट्राचा संघटना पालघर जिल्हाप्रमुख),श्री.रवींद्र (बंड्याभाऊ )म्हात्रे (नगरसेवक पालघर नगर परिषद)कू.प्रियंका म्हात्रे (नगरसेविका पालघर नगरपरिषद) माजी प्राचार्य श्री. प्रफुल झोडापे सर, श्री. जयभारत भालेराव, श्री सचिन लोखंडे (कार्याध्यक्ष पालघर जिल्हा)श्री.राहुल घरत (पालघर शहर अध्यक्ष शिवसेना) श्री.रत्नाकर भालेराव (कार्याध्यक्ष पालघर जिल्हा तथा जिला नियोजन समिती सदस्य पालघर जिल्हा )श्री.नरेंद्र करंकाळे (पालघर तालुका अध्यक्ष) सौ.सविता मल्लाह (पालघर शहर संघटक महिला आघाडी शिवसेना) सौ.सरिता ठाकूर (पालघर उप शहर संघटक महिला आघाडी शिवसेना )श्री विलास शिंदे (उपाध्यक्ष पालघर जिल्हा ) श्री सचिन भारस्कर (पालघर जिल्हा संघटक ),सौ.वर्षा काटेला (अध्यक्षा अनुसूचित जमाती सेल पा.जी महिला आघाडी )सौ.संजोग उपाध्याय, महेंद्र जाधव (बौद्धाचार्य ), सुनील जाधव, राहुल म्हात्रे, संजू धोत्रे, राजन राऊत,धीरज मोरे, सुमित जाधव,इत्यादी रिपाई आ.,शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मी वडार महाराष्ट्राचा संघटना, अनेक बौद्ध बांधव,सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी, मान्यवर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. शरद जाधव (युवा अध्यक्ष पालघर तालुका) राम ठाकूर (युवा उपाध्यक्ष पालघर तालुका )संजय पाटील, संकेत वरठा,दीपेश गायकवाड, अक्कू गायकवाड, अनिल शिरसाठ,हर्षला धनवा, सुरेखा नम, सुप्रिया जाधव, संगिनी जाधव,संजय जाधव, वर्षा उंबरठा इत्यादी कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले.