पालघर जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नवतरुणांमध्ये सुरक्षित वाहन चालवण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा वाहतूक शाखा, पालघर यांच्यातर्फे दांडेकर कॉलेज, पालघर येथे वाहतूक नियम जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाचे आयोजन पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे नेतृत्व सुरेश साळुंखे (प्रभारी अधिकारी, जिल्हा वाहतूक शाखा, पालघर) यांनी केले.
कार्यक्रमात सहभागी अधिकारी
पोलीस उपनिरीक्षक संदीप नांगरे,पोलीस उपनिरीक्षक बायक्या सुतार,ASI पंढरीनाथ कराटे,पोलीस हवालदार संतोष हाडळ,
पोलीस हवालदार भास्कर चौधरी,पोलीस अंमलदार शिवा राठोड,यांच्यासह कृषी महाविद्यालय, आसनगाव येथील पथकही विशेष उपस्थित होते.यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना खालील वाहतूक नियमांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले वाहन चालवताना सीट बेल्ट वापरणे,हेलमेट परिधान करूनच दुचाकी चालवणे,त्रिकुट (Triple Seat) वाहन टाळणे,अल्पवयीन मुलांनी वाहन न चालवणे, योग्य वयातच वाहन परवाना (लायसन्स) काढणे,भरधाव वेगाने वाहन न चालवणे, मोबाईल वापर टाळणे आणि सार्वजनिक सुरक्षेचे भान राखणे
पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उदाहरणे, आकडेवारी आणि प्रात्यक्षिके याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रस्त्यांवरील जबाबदारी आणि सुरक्षिततेचे भान दिले. उपस्थित विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि शंका-समाधान सत्रात प्रश्न विचारून अधिक माहिती मिळवली.
“सुरक्षिततेचा संदेश प्रत्येक तरुणापर्यंत” या उपक्रमामध्ये वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी रस्ते सुरक्षा ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून नैतिक जबाबदारीही आहे, यावर भर दिला.
जिल्हा वाहतूक शाखा, पालघर ही भविष्यातही विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये अशा जनजागृती उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे सुरेश साळुंखे यांनी सांगितले.
आजच्या पिढीला केवळ वाहने चालवण्याचा अधिकार मिळतोय, पण त्याबरोबरच शिस्त आणि जबाबदारी यांची जाणीव करुन देणे ही समाजाची गरज आहे. पालघर वाहतूक शाखेचा हा उपक्रम हा समाजाभिमुख पोलीस प्रशासनाचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.