वसई तालुक्यातील नागरिकांना प्रवासासाठी अधिकाधिक सोयी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आज दिनांक २८ जुलै २०२५ रोजी वसई गाव बस डेपोमध्ये ५ नवीन एस.टी. बसेस दाखल झाल्या. या बसेसच्या लोकार्पण व पूजनाचा सोहळा आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. धार्मिक विधीनुसार पूजन करून आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी या बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या. तसेच सहकाऱ्यांसह बसची फेरी करून या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
या सोहळ्यानंतर आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी सांगितले की, “वसईत बसची मोठी कमतरता होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदारांना प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही समस्या सोडवण्यासाठी मी राज्याचे परिवहन मंत्री मा.ना. श्री. प्रताप सरनाईक साहेबांसोबत झालेल्या बैठकीत वसईच्या वाहतूक व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली आणि सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून ३ एप्रिल २०२५ रोजी पहिल्या टप्प्यातील ५ एस.टी. बसेस वसई डेपोमध्ये दाखल झाल्या, तर दुसऱ्या टप्प्यातील ५ बसेस १५ जून २०२५ रोजी अर्नाळा बस डेपो येथे प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध झाल्या. आज तिसऱ्या टप्प्यात आणखी ५ नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. फक्त तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण १५ नवीन एस.टी. बसेस वसई विधानसभा मतदारसंघात आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.”
त्यांनी पुढे सांगितले की, “ही फक्त सुरुवात आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी बसेस उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील. ग्रामीण भागात आणि उपनगरी भागात वाहतूक व्यवस्थेची उभारणी करणे हे आमचे प्राधान्य आहे. येत्या वर्षभरात आणखी अनेक एस.टी. बसेस मतदारसंघात दाखल करण्यासाठी मी अथक प्रयत्न करणार आहे.”
या उपक्रमामुळे वसईकरांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार असून, विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या कार्यक्रमाला वसई बस डेपो मॅनेजर श्रीमती प्रज्ञा अमोल उगले, वसई शहर मंडळ अध्यक्षा श्रीमती गीतांजली दरीवाला, सरचिटणीस श्री. संतोष काकड,चेतन वर्षीवर , श्री.नंदकुमार महाजन, श्री. बिजेंद्र कुमार, श्री.अजित सिंग,श्रीमती अपर्णा पाटील, श्री.मुकुंद मुळे,श्री.संदीप पाटील, श्री.विकास सिंह, श्री.अमित पवार,श्री.मनमित राऊत,श्री.अनिल राऊत,श्री.चंद्रकांत पाटील, श्री.मारुती गुटकुळे, श्री.नितीन म्हात्रे,श्री.सुशील ओगले,श्री. दिलीप रकपाल,अविनाश चावंडे,श्री.जाधव,श्री. सुनील पांडे, श्री. अशोक मिश्रा,श्री. प्रवेश दुबे, श्री. राजेश नायर,श्री.प्रथमेश ब्राम्हणिया,श्री. पुंडलिक राठोड, श्री. मनोज चोटालिया, तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या नेतृत्वाखाली वसई विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे आणि त्यासाठी आम्ही सातत्याने काम करत राहू.
