भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.रविंद्र दादा चव्हाण यांच्या व वसईच्या संघर्षकन्या आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा गटातील व बहुजन विकास आघाडी पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश

आधी राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” या राष्ट्रहितप्रधान विचारधारेवर विश्वास ठेवत व पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र दादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून वसई विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात आज दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय नरिमन पॉईंट मुंबई येथे भव्य प्रमाणात जाहीर प्रवेश केला.

मा. रविंद्र दादा चव्हाण यांच्या व वसईच्या संघर्षकन्या, आमदार. सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या

शुभहस्ते नवीन कार्यकर्त्यांचे भाजपा परिवारात स्वागत करण्यात आले.

         आज पक्षप्रवेश केलेल्या प्रमुख मान्यवरांमध्ये: श्री. निलेश भानुसे – वसई शहर समन्वयक,श्री. सुनील मिश्रा – तालुका अधिकारी, युवासेना,श्री. प्रकाश देवळेकर – उपतालुका प्रमुख,श्री. वैभव म्हात्रे – उपजिल्हा अधिकारी, युवासेना,श्री. योगेश भानुसे – उपशहर प्रमुख,श्री. संतोष घाग, श्री. नितीन ठाकूर, श्री. संतोष कनोजिया, श्री. दिनेश भानुशाली – बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी श्री. आनंद पाटील – सामाजिक कार्यकर्ते

यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी जोशात भाजपा प्रवेश केला.

          या  कार्यक्रमाला आमदार मा. विक्रांतजी पाटील, श्रीमती माधवीताई नाईक, आमदार श्री. राजन नाईक, श्री. नवनाथ बन, वसई-विरार शहर भाजपा जिल्हा अध्यक्षा श्रीमती प्रज्ञा पाटील, श्री. महेंद्र पाटील, व सर्व मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        या पक्षप्रवेशाने वसईतील भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात वसई विरार शहर महानगरपालिका मध्ये भाजपाचा विजय अधिक निश्चित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button