
पालघर:
आज सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी पालघर जिल्हाधिकारी मा. श्रीमती ईंदुराणी जाखड यांना पालघर नागरी कृती समितीतर्फे निवेदन सादर करण्यात आले. या वेळी माजी राज्यमंत्री श्रीमती मनीषाताई निमकर व सौ. शालीनीताई मेमण यांची उपस्थिती होती.
निवेदनामध्ये खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या –
- पालघर स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय सध्याच्या जागेतून हटवून तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस हलविण्यात यावे.
- पालघर स्टेशनलगतची १८ गुंठे पीडब्ल्यूडीची जागा पालघर नगरपरिषदेकडे वर्ग करून बसस्थानक, दुकाने, मोटरसायकल स्टँड व व्यापारी इमारत उभारण्यात यावी, ज्यातून नगरपरिषदेला उत्पन्न मिळेल.
- जुने पालघर येथे अत्याधुनिक मच्छीमार्केट उभारून त्यात कोल्ड स्टोरेजची सोय करावी. वरच्या मजल्यावर प्राणी व कुक्कुट पक्षी वधासाठी स्वतंत्र जागा व पशुवैद्यकीय तपासणीची व्यवस्था असावी.
- पालघर ते बोईसर रस्ता विकासाच्या दोनशे कोटी रुपयांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून कारवाईची मागणी.
पालघर नागरी कृती समितीने इशारा दिला आहे की, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार?