बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक, माजी अधिकारी व व्यावसायिकांचा भाजपा प्रवेश

भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून वसई विधानसभा क्षेत्रातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी आज मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई येथे भव्य जाहीर पक्षप्रवेश केला.

भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी , महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस , भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. श्री. रवींद्र दादा चव्हाण व वसई विधानसभेच्या संघर्षकन्या आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या कार्यप्रणाली व विकासकामांवर प्रभावित होऊन बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सरदार श्री. छोटू आनंद, सामाजिक कार्यकर्ते श्री. राजू इसाई, मा. विशेष कार्यकारी अधिकारी सरदार रविंद्र सिंग आनंद, युथ काँग्रेसचे माजी सरचिटणीस करणदीप सिंग अरोरा, तसेच प्रतिष्ठित व्यावसायिक, माजी अधिकारी आणि विविध समाजघटकातील मान्यवरांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्यात बिझनेसमॅन सरदार चरणजीत सिंग सभरवाल, हॉटेल व्यावसायिक सरदार गुरजिंदर सिंग चावला, माजी एअर फोर्स अधिकारी सरदार सुकदेव सिंग, सरदार भूपिंदर सिंग, पंजाबी संस्कृति समाज संस्थापक सरदार मनजीत लांबा, माजी मर्चंट नेव्ही अधिकारी सरदार दिलबाग सिंग, सरदार गुरजीत सिंग छबरा, सरदार जस्मीत सिंग छबरा, सरदार भूपिंदर सिंग हंसपाल तसेच केरळ समाजाचे श्री. सुरेंद्र नायर यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष आ. श्री. रवींद्र दादा चव्हाण व आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या हस्ते सर्व नव्या कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले व पक्षाच्या राष्ट्रहित व समाजहितासाठी काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

या सोहळ्याला श्री. नवनाथ बन, भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस श्री. बिजेंद्र कुमार, श्रीमती अपर्णा पाटील, माजी नगरसेवक श्री. दिनेश भानुशाली, श्री. संतोष घाग, श्री. मिकी आनंद व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button