
पालघर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) पालघर जिल्हा तर्फे अनंत चतुर्थीच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, विविध पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, पोलीस कर्मचारी व नेते मंडळींचा शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली.
या कार्यक्रमास रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, उपाध्यक्ष कुंदन मोरे, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा विमल चौधरी, सुप्रिया जाधव, जिल्हा संघटिका संजोग उपाध्याय, तालुका युवा अध्यक्ष शरद जाधव, उपाध्यक्ष जागृत जाधव, राम ठाकूर, शहर संघटिका अर्चना अडबोले, सुरेखा नम, रुपाली राऊत, नीलम टेम्भेकर, शिला जाधव, बबिता मॅडम, तसेच राजेश उपाध्याय, दीपेश गायकवाड, गणेश घाडीगावकर, राज टेम्भेकर, संकेत जाधव, अंजेला खान, हितेश वाडिया आदी मान्यवर उपस्थित होते.