
सफाळे :
संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सफाळे येथील देवभूमी सभागृहात हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. संघटनेच्या अध्यक्षा सुमनताई मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून
वैदेही वाढाण (अनुसूचित जाती-जमाती आयोग सदस्य),
सुरेश जाधव (भारतीय रिपब्लिकन पार्टी)
माधुरी तांडेल (दवणे) मॅडम (विस्तार अधिकारी प्रभारी गटशिक्षणाधिकारी),
धर्मेंद्र शर्मा (कन्यादान महादान संस्था अध्यक्ष),
योगिता विवेक डांगे (बालविकास प्रकल्प अधिकारी),
दीपविजय भवर (सहाय्यक पोलीस निरीक्षक पीएसआय),
यांची प्रमुख उपस्थिती होती.
🎖️ पुरस्कार वितरण
कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण करून शिक्षक, शाळा व अंगणवाडी सेविकांचा गौरव करण्यात आला.
🔹 आदर्श शाळा पुरस्कार
जिल्हा परिषद शाळा फुलपाडा
जिल्हा परिषद शाळा आचोळे
जिल्हा परिषद शाळा मनवेल पाडा
जिल्हा परिषद शाळा गोखिवरे
जिल्हा परिषद शाळा भाटपाडा
🔹 आदर्श शिक्षक पुरस्कार
माननीय श्री. गौतम मस्के (साठे कॉलेज)
माननीय सौ. छाया प्रदीपकुमार पाटील (मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा सागावे)
डॉ. श्री. सतीश श्रीधर कोलते (के.सी. कॉलेज, चर्चगेट)
🔹 केंद्र शाळा प्रमाणपत्रक वाटप
जिल्हा परिषद शाळा केंद्र सफाळे व केंद्रातील सर्व शिक्षक
जिल्हा परिषद शाळा केंद्र नवघर व शिक्षक
जिल्हा परिषद शाळा केंद्र आगरवाडी व सर्व शिक्षक
जिल्हा परिषद शाळा जीवदानी
जिल्हा परिषद शाळा नवघर केंद्रप्रमुख प्रकाश दादू भोईर
मान. सौ. अश्विनी गौतम मस्के (गुरुकुल प्राइड इंटरनॅशनल स्कूल, विरार पूर्व)
🔹 अंगणवाडी शाळा प्रमाणपत्र वाटप
मनोर विभाग 1, 2, 3
मासवन विभाग 1, 2
सोमटा विभाग 2, 4
सफाळे विभाग 1, 2, 3
तारापूर, दांडी विभाग 1, 2
माहीम, एडवण, मुरबे
सातपाटी विभाग
🌸 मान्यवरांचे मनोगत
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांचे समाजातील योगदान अधोरेखित केले. “शिक्षक हे समाजाचे शिल्पकार असून त्यांच्यामुळेच विद्यार्थी घडतात. शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे,” असे पाहुण्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.