
ग्रामपंचायत नांदगाव व नांदबादेवी युवा ग्रामोत्सव मंडळ, नांदगाव यांनी प्रस्तावित जिंदाल बंदर प्रकल्पाला विरोध नोंदवण्यासाठी आणि येत्या ६ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या पर्यावरणविषयक जनसुनावणीसाठी हरकती सादर करण्याच्या उद्देशाने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरात येणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाकडून हरकती लेखी स्वरूपात घेतल्या जात आहेत. ग्रामस्थांचा एकमताने होत असलेला विरोध व्यवस्थितपणे त्यांच्या इच्छेनुसार नोंदवून तो जनसुनावणीत प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यामधून स्थानिकांचे पर्यावरण, भूमी व उपजीविकेचे रक्षण करण्याची एकत्रित भूमिका स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आली आहे.

