माजी नगरसेवक चंद्रशेखर (बंड्या) वडे यांच्या वाढदिवसानिमित्त पालघरमध्ये मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन

पालघर │ सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत माजी नगरसेवक चंद्रशेखर (बंड्या) वडे यांच्या वाढदिवसानिमित्त पालघर येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर लायन्स क्लब ऑफ पालघर येथे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरात रक्तदाब, नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन चाचणी, महिलांसाठी विशेष तपासणी आदी सेवा मोफत पुरविण्यात आल्या. स्थानिक डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक औषधे व मार्गदर्शन दिले.

या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. आरोग्य तपासणीबरोबरच लोकांना आरोग्य जपण्याबाबत जनजागृतीही करण्यात आली.

या प्रसंगी बोलताना माजी नगरसेवक चंद्रशेखर ( बंड्या) वडे यांनी सांगितले की,

“समाजासाठी काहीतरी करण्याची भावना हीच खरी सेवा आहे. माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकांच्या आरोग्यसेवेसाठी छोटासा प्रयत्न करणे हे माझ्यासाठी आनंददायी आहे.”

कार्यक्रमाला अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
या उपक्रमामुळे चंद्रकांत वडे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श पुन्हा एकदा समोर आला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button