
पालघर :
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत करण्यासाठी कैलास म्हात्रे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधत, प्रत्येक प्रभागात बैठका घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन म्हात्रे यांनी हाती घेतले आहे.
स्थानिक नागरिक, तरुण आणि महिला कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता कैलास म्हात्रे यांचा भाजप प्रवेश हा पालघर राजकारणात नवा ऊर्जा संचार करणारा ठरत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक जुने कार्यकर्ते पुन्हा सक्रिय झाले असून, नव्या कार्यकर्त्यांचीही पक्षात भर पडत आहे.
आगामी निवडणुकीत विकास आणि सुशासन हा आपला प्रमुख अजेंडा असेल, असे म्हात्रे यांनी सांगितले. त्यांनी स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याचा आणि जनतेच्या अपेक्षांनुसार काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पक्षाच्या नेत्यांनीही म्हात्रे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत, त्यांच्या नेतृत्वामुळे पालघर जिल्ह्यात भाजप अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.