वसईच्या प्रगतीला नवे बळ — आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या प्रयत्नांना यश!

वसई, दि. २९ ऑक्टोबर :
महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणाचा लाभ आता वसईकरांपर्यंत पोहोचत आहे. वसई विधानसभा क्षेत्रासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत तब्बल २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीमुळे वसईतील विविध प्रभागांमध्ये मूलभूत सुविधा उभारणीसह पर्यटन विकासाला नवसंजीवनी मिळणार आहे.

ही मंजुरी मिळविण्यासाठी वसई विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांच्या पुढाकारामुळे वसईच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या स्थळांना नवे पर्यटन आयाम मिळणार आहेत.

स्थानिक नागरिकांना रस्ते, प्रकाशव्यवस्था, सार्वजनिक सोयीसुविधा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सेवांमध्ये सुधारणा दिसून येणार असून, पर्यटनवृद्धीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील.

आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी यासाठी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

त्यांनी सांगितले की, “महायुती सरकार हे विकास आणि जनकल्याण यांचे सरकार आहे. वसईच्या प्रगतीसाठी मिळालेला हा निधी म्हणजे स्थानिक जनतेच्या विश्वासाला दिलेले उत्तर आहे.”

वसई परिसरातील नागरिकांमध्ये या निर्णयामुळे समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. वसईच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button