
पालघर, दि. ३० ऑक्टोबर :
पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिनांक २८ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत स. तू. कदम विद्यालय, पालघर येथे आयोजित मुंबई विभागीय शालेय बेसबॉल स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मुंबई विभागातील एकूण १३ संघांनी सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, मुख्य कार्यकारी क्रीडा अधिकारी गिरीश इरणक, जीवन विकास संस्थेचे कार्याध्यक्ष प्रणव कदम, कोमल कदम, दांडी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मनिषा तारवी, राज्य सहसचिव अशोक सरोदे, तसेच जिल्हा संघटनेचे पदाधिकारी नितीन म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन करत स्पर्धेला चुरस आणली.
🏆 स्पर्धेतील निकाल खालीलप्रमाणे :
🔹 १९ वर्षांखालील मुलांचा गट :
१️⃣ प्रथम क्रमांक – पालघर जिल्हा
२️⃣ द्वितीय क्रमांक – मुंबई शहर जिल्हा
३️⃣ तृतीय क्रमांक – मुंबई उपनगर जिल्हा
🔹 १९ वर्षांखालील मुलींचा गट :
१️⃣ प्रथम क्रमांक – मुंबई उपनगर जिल्हा
२️⃣ द्वितीय क्रमांक – वसई-विरार महानगरपालिका
३️⃣ तृतीय क्रमांक – मुंबई शहर जिल्हा
🔹 १७ वर्षांखालील मुलांचा गट :
१️⃣ प्रथम क्रमांक – रायगड जिल्हा
२️⃣ द्वितीय क्रमांक – पालघर जिल्हा
३️⃣ तृतीय क्रमांक – मुंबई शहर जिल्हा
🔹 १७ वर्षांखालील मुलींचा गट :
१️⃣ प्रथम क्रमांक – रायगड जिल्हा
२️⃣ द्वितीय क्रमांक – नवी मुंबई महानगरपालिका
३️⃣ तृतीय क्रमांक – मुंबई उपनगर जिल्हा
या स्पर्धेतून विजेते संघ महाराष्ट्र राज्य शालेय बेसबॉल स्पर्धेत मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करणार असून, त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन व्यक्त केले जात आहे.
क्रीडाप्रेमी विद्यार्थी, प्रशिक्षक आणि पालकांच्या उपस्थितीत स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध आणि जोशात पार पडली.
पालघर जिल्ह्यातील या यशामुळे स्थानिक क्रीडाक्षेत्रात नवी ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण झाली आहे.