महाराष्ट्र राज्यात २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायती निवडणुकांची घोषणा२ डिसेंबर रोजी मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायती निवडणुकीची घोषणा केली आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे :

नामांकन अर्ज दाखल : १० ते १७ नोव्हेंबर २०२५

अर्ज छाननी : १८ नोव्हेंबर २०२५

अर्ज माघारीची अंतिम तारीख : २१ नोव्हेंबर २०२५

मतदान : २ डिसेंबर २०२५

मतमोजणी : ३ डिसेंबर २०२५

या निवडणुकीत एकूण १ कोटी ६ लाख २२ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ५३ लाख पुरुष आणि ५३ लाख २२ हजार महिला मतदारांचा समावेश आहे.

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या या निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. स्थानिक विकास, मूलभूत सुविधा, तसेच नगरविकास आराखड्यांबाबत नागरिकांचा कल कोणत्या पक्षाकडे राहतो हे या निवडणुकांमधून स्पष्ट होणार आहे.

राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करण्याची आणि प्रचाराची तयारी वेगाने सुरू केली असून, राज्यभरात स्थानिक राजकीय वातावरण रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button