
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते एक कोटींच्या रस्ते व गटार कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन
पालघर, दि. ३० ऑक्टोबर २०२५ : पालघर पूर्वेतील नवली येथील इस्कॉन मंदिर ते राधिका अपार्टमेंट दरम्यानचा रस्ता व गटार कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज नागरिकांच्या उपस्थितीत भूमिपूजनाने करण्यात आला. या महत्त्वाच्या विकासकामासाठी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गणेशजी नाईक यांनी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे.
स्थानिक नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर या कामाला मंजुरी मिळाली असून, आज या कामाची प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. नागरिकांनी यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विरेंद्र कमळाकर पाटील, श्री. अजय संखे, श्री. भुनेश्वर घरत, श्री. राजपूत, श्री. शिरीष सावलानी, श्री. अरुण बारी, श्री. जितेंद्र राऊत, श्री. अशोक वरखुंडे, श्री. अमोल ठाणगे, श्री. संदीप तिवारी, श्री. आलेख शुक्ला, श्री. अतुल संखे, हरे कृष्ण मंदिर अध्यक्ष श्री. संदीप, श्री. आशिष नंदुरकर, श्री. सचिन पाटील, सौ. अपेक्षा संखे, सौ. कल्पना वरखुंडे, श्री. संदीप राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
या कामामुळे नवली परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या रस्ते आणि जलनिस्सारणाच्या समस्येत दिलासा मिळणार आहे. स्थानिक रहिवाशांनी या विकासकामामुळे परिसराचे रुपडे बदलण्याची आशा व्यक्त केली असून, “जनतेच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले,” असे मत नागरिकांनी व्यक्त केले.