
पालघर :
पालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी पालघर जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांकडून ठोस व एकमुखी मागणी पुढे येत असून रईस खान आणि चंद्रशेखर वडे{ बंड्या} यांची निवड व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकाळात जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला असून विकासाभिमुख, पारदर्शक आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
प्रभागस्तरावर पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर रईस खान यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. तर चंद्रशेखर वडे यांनी प्रशासनाशी समन्वय साधत विकासकामांना गती देण्यावर भर दिला आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदासाठी या दोघांची निवड झाल्यास पालघरच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “अनुभव, कार्यक्षमता आणि लोकसंपर्क या तिन्ही बाबतीत रईस खान व चंद्रशेखर वडे सक्षम आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पालघर शहराचा विकास अधिक वेगाने होईल.” अनेक सामाजिक संघटना व नागरिकांनी याबाबत निवेदनांद्वारेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आगामी निर्णय प्रक्रियेत जनभावनेचा सन्मान राखत उपनगराध्यक्षपदासाठी योग्य नेतृत्वाची निवड होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, पालघरकरांच्या नजरा आता अंतिम निर्णयाकडे लागल्या आहेत.
Fantastic website you have here but I was wanting to know if you knew of any user discussion forums that cover the same topics discussed here?
I’d really love to be a part of community where I can get opinions from other knowledgeable people
that share the same interest. If you have any suggestions, please let me know.
Cheers!