पालघर नगरपरिषद 2026 : उपनगराध्यक्षपदी श्री. राजेंद्र पाटील यांची निवड

पालघर नगरपरिषद 2026 च्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटातून श्री. राजेंद्र पाटील यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या निवडीमुळे पालघर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
श्री. राजेंद्र पाटील हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी नेहमीच जनहिताचे प्रश्न प्राधान्याने मांडले आहेत. पालघरच्या मूलभूत सुविधांचा विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात भरीव काम करण्याची त्यांची ठाम भूमिका आहे. उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी पालघर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
त्यांच्या निवडीनंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नागरिक, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांकडून त्यांचा सत्कार व शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
पालघर नगरपरिषदेच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी श्री. राजेंद्र पाटील नक्कीच प्रभावी नेतृत्व देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button