पालघर नगरपरिषद हद्दीत विकासकामांचा धडाका; विविध कामांचे भूमिपूजन उत्साहात

पालघर :
पालघर नगरपरिषद हद्दीतील अल्याळी, नवापाडा, भैय्यापाडा, हनुमान मंदिर परिसर, ब्रह्मनगर, विश्वनाथ राजत रोड आदी विविध भागांत नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी करण्यात येणाऱ्या अनेक विकासकामांचे भूमिपूजन सोमवार, दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी विविध वेळेत उत्साहात पार पडले.
या विकासकामांमध्ये गटार व्यवस्था, समाजमंदिर बांधकाम, व्यायामशाळा, तलाव सुशोभीकरण, अंतर्गत रस्ते व गटार निर्मिती अशा महत्त्वपूर्ण कामांचा समावेश असून, यामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छता, आरोग्य व जीवनमान उंचावण्यास मोठा लाभ होणार आहे.
या भूमिपूजन समारंभांना नगराध्यक्ष मा. श्री. उत्तम मोरेश्वर घरत, उपनगराध्यक्ष मा. श्री. राजेंद्र आत्माराम पाटील, मुख्याधिकारी मा. डॉ. प्रशांत जाधव, बांधकाम सभापती मा. श्री. चंद्रशेखर गोपीनाथ वडे, तसेच शिवसेना गटनेत्या मा. डॉ. सौ. उज्ज्वला केदार काळे, भाजप गटनेते मा. श्री. भावानंद शांताराम संखे, उबाठा गटनेते मा. श्री. राहुल प्रकाश पाटील, स्थानिक नगरसेवक मा. श्री. अमोल प्रकाश पाटील, नगरसेविका मा. सौ. मेघा विनय आघाव / मा. सौ. राधा जितेंद्र पामाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी बोलताना सांगितले की, पालघर शहराचा सर्वांगीण विकास हाच नगरपरिषदेचा मुख्य ध्यास असून, नागरिकांच्या गरजांनुसार पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे. आगामी काळातही अशाच दर्जेदार व लोकाभिमुख विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास नगरसेवक, नगरसेविका, नामनिर्देशित सदस्य, अधिकारी, पदाधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकासकामांच्या प्रारंभामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button