मल्टीटॅक पॉलिमर्स कंपनीसमोर कामगारांचे आमरण उपोषण; चर्चेनंतर मागण्या मान्य

पालघर : शिवशक्ती भीमशक्ती व रिपाई कामगार संघटनेच्या वतीने दि. 23 मार्च 2026 रोजी मल्टीटॅक पॉलिमर्स कंपनीच्या कामगारांनी आपल्या न्याय हक्कांसाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर कंपनीचे मालक श्री. शुभाष गुवेकर (CO), रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, कामगार नेते श्री. अशोक बंडे, कामगार आयुक्त श्री. महाले साहेब तसेच कामगार प्रतिनिधी यांच्यात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
चर्चेनंतर कंपनीचे मालक शुभाष गुवेकर यांनी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करत येत्या 2 एप्रिल 2026 रोजी कामगारांचा हिशोब पूर्ण करून इतर मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, कामगार आयुक्त महाले साहेब व दाभाडे सर यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देत कामगारांची समजूत काढली आणि उपोषण सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे आंदोलन शांततेत संपुष्टात आले.
या निर्णयामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या मध्यस्थीने प्रश्न मार्गी लागल्याचे चित्र दिसून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button