पालघरमध्ये शिवसेनेच्या महिला संघटनेत नवीन नियुक्ती; सुचिता लतेश घरत यांच्यावर जबाबदारी

पालघर : शिवसेना पक्षाच्या महिला संघटनेत संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी नवीन नियुक्त्या करण्यात येत असून, पक्षाच्या वतीने सुचिता लतेश घरत यांची उपशहर महिला संघटक, पालघर शहर वॉर्ड क्रमांक ६ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती शिवसेना नेत्या तथा पालघर जिल्हा महिला संघटक सौ. वैदेही विशाल वाढण यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली. नियुक्ती पत्रात नमूद केल्याप्रमाणे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रसार आणि मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे.
सुचिता लतेश घरत यांनी पक्षाच्या महिला आघाडीचे काम अधिक प्रभावीपणे राबवून स्थानिक महिलांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून महिला संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सुजिता लतेश घरत यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नियुक्तीमुळे पालघर शहरातील महिला संघटनेला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button