
पालघर, दि. 26 ऑक्टोबर 2025 :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे जिल्हाध्यक्ष तसेच बिज दत्ता वेलफेअर असोसिएशनचे डायरेक्टर श्री. सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज कॉलेज रोड, पालघर येथे दिवंगत रोहिणी ताई गायकवाड (जिल्हा अध्यक्षा) यांच्या स्मरणार्थ एक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळेसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला.
या वेळी सुरेखा नम, सचिन घाडीगावकर, वर्षा उंबरसडा, चंद्रिका उंबरसडा, वंदना टोकरे यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून, स्थानिक नागरिकांनीही या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
रोहिणी ताई गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा या उपक्रमातून पुढे नेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.