
मुंबई प्रतिनिधी प्रीती गडा
मुंबई, वांद्रे (पूर्व) :
भाजप नेते व मुंबई उपनगरचे पालकमंत्री नामदार ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते वांद्रे स्कायवॉक (वांद्रे स्टेशन ते कलानगर) चे उद्घाटन सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता उत्साहात पार पडले. या स्कायवॉकमुळे वांद्रे परिसरातील नागरिक, प्रवासी व कामगार वर्गाला सुरक्षित व सुलभ वाहतुकीची मोठी सोय उपलब्ध झाली आहे.
उद्घाटन सोहळा म्हाडा गेट क्रमांक २ जवळ, सर्व्हिस रोड, वांद्रे (पूर्व), मुंबई–४०००५१ येथे पार पडला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. स्कायवॉक सुरू झाल्याने रेल्वे स्थानक ते कलानगरदरम्यान पादचाऱ्यांची वाहतूक अधिक सुरक्षित, जलद व सोयीस्कर होणार असून रस्त्यावरील अपघात व वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
या प्रसंगी उपस्थितांनी पालकमंत्री नामदार ॲड. आशिष शेलार यांचे विकासकामांसाठी विशेष आभार मानले. वांद्रे (पूर्व) परिसराच्या दृष्टीने हा स्कायवॉक एक महत्त्वपूर्ण विकासात्मक टप्पा असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच मंडळ अध्यक्ष वांद्रे (पूर्व विधानसभा) शैलेश पाटील, विजय मिश्रा व सौ. स्नेहा तांबे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.