पालघर सुन्नी जामा मशिदीत २७२ हज यात्रेकरूंकरिता लसीकरण व हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

पालघर :
आज पालघर येथील सुन्नी जामा मशिदीत पालघर जिल्ह्यातून हज यात्रेस जाणाऱ्या एकूण २७२ हज यात्रेकरूंकरिता (हाजी) लसीकरण व हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २३२ हज यात्रेकरूंनी प्रत्यक्ष उपस्थिती नोंदवली.
या शिबिरामध्ये हज यात्रेसंदर्भातील आवश्यक मार्गदर्शन, आरोग्यविषयक सूचना तसेच अनिवार्य लसीकरण करण्यात आले. सुन्नी जामा मशिद ट्रस्टच्या वतीने सर्व उपस्थित हज यात्रेकरूंसाठी चहा, नाश्ता व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
यावर्षी पालघर जिल्ह्यातून तब्बल २७२ हज यात्रेकरू पवित्र हज यात्रेसाठी जाणार असल्याने मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण आहे.
या यशस्वी शिबिरासाठी पालघर मुस्लिम जमातच्या वतीने पालघरचे सिव्हिल सर्जन डॉ. मार्ड , डॉ. सोनवणे, डॉ. योगेश सुरळकर, डॉ. नम्रता तसेच उपस्थित सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button