
मुंबई प्रतिनिधी प्रीती गडा
मुंबई, वांद्रे (पूर्व) :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करत नूतन सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. हा उद्घाटन सोहळा आमदार वरुण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
वांद्रे (पूर्व) येथील भीमाबाई चाळ, गोळीबार रोड परिसरात सुमारे पाच आसनांची नूतन शौचालय सुविधा नागरिकांसाठी खुली करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना विशेषतः महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या शौचालयाच्या उभारणीसाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी तसेच स्थानिक नेतृत्वाने विशेष प्रयत्न केले. या उपक्रमामागे स्वच्छता, आरोग्य आणि नागरी सुविधा सुधारण्याचा उद्देश असून, स्थानिक नागरिकांनी या कामाचे स्वागत केले आहे.
यावेळी शिवसेना युवासेना सचिव वरुण सतीश सरदेसाई यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहर स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवण्यासाठी अशा विकासात्मक उपक्रमांची मालिका भविष्यातही सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.