रॉयल स्टार इंग्लिश स्कूलचा वार्षिक समारंभ उत्साहात संपन्न

पालघर : रिपाई पक्षाचे जिल्हा संघटक राजकुमार यादव यांच्या रॉयल स्टार इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन (Annual Function) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल त्यांना शाबासकी देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला अरुण पाल सर, गधडी सर, शाळेचे संचालक, शिक्षकवृंद, मान्यवर तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले असून उपस्थितांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button