पालघरमध्ये नगरसेवक रईस खान यांची सर्वधर्मीय इफ्तार पार्टी उत्साहात

पालघर : पालघरचे नगरसेवक रईस खान यांनी आयोजित केलेली सर्वधर्मीय इफ्तार पार्टी उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या इफ्तार कार्यक्रमाला पालघरचे नगराध्यक्ष उत्तम घरात, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे तसेच शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते. विविध पक्षांचे कार्यकर्ते, मुस्लिम समाजातील नागरिक आणि पत्रकार बंधू देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी सर्व धर्म आणि जातीतील लोक एकत्र येऊन सौहार्द आणि एकतेचा संदेश दिला. कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांचे मुस्लिम समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले.
नगरसेवक रईस खान यांच्या या उपक्रमामुळे पालघरमध्ये सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देण्यात आला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button