
पालघर: शहराला हादरवून सोडणाऱ्या हिट अँड रन प्रकरणात अखेर महत्त्वाची घडामोड झाली असून, ऑटो रिक्षा चालक नासिर खलिफा यांच्या दुर्दैवी मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीला पालघर पोलिसांनी अटक केली आहे.
या गंभीर प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि प्रभावी तपासामुळे अल्पावधीत आरोपीला जेरबंद करण्यात यश आले. या कारवाईबद्दल पालघरचे पोलिस अधीक्षक मा. यतेश देशमुख साहेब तसेच संपूर्ण पोलिस दल आणि वाहतूक शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत होता. मात्र, पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून आरोपीला अटक केल्यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कार्याचे स्वागत करत, “अशा प्रकारच्या जलद कारवाईमुळे कायद्यावरील विश्वास अधिक दृढ होतो,” अशी प्रतिक्रिया दिली.
या प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, पालघर पोलिस नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी सज्ज आहेत.