इनर व्हील क्लब ऑफ पालघरच्या ३१ व्या पदग्रहण सोहळ्यात नव्या कार्यकारिणीचा पदभार ‘सेवेतून समाजपरिवर्तन’चा ध्यास; मागील वर्षात ₹५० लाखांहून अधिक मूल्याचे समाजोपयोगी प्रकल्प पूर्ण

पालघर | प्रतिनिधी
पालघर (पूर्व) येथील दादोबा ठाकूर हॉलमध्ये इनर व्हील क्लब ऑफ पालघरचा ३१ वा पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात सन २०२६-२७ या वर्षासाठी ॲड. अनुश्री जयेश आव्हाड यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत समाजसेवा अधिक व्यापक, परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्याचा संकल्प व्यक्त केला.यावेळी मावळत्या अध्यक्षा ॲड. विनिता दिपेश पाटील यांनी नव्या अध्यक्षांकडे नेतृत्वाची धुरा सुपूर्द केली. नव्या कार्यकारिणीत सचिवपदी मृदुला सावे, उपाध्यक्षपदी शमीम मर्चंट, आयपीपीपदी ॲड. विनिता पाटील, खजिनदारपदी चिस्तियाना धनानी, आयएसओपदी अमिता पाटील आणि सीसीपदी मनीषा करंजीकर यांनी पदभार स्वीकारला.ॲड. विनिता दिपेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील मागील कार्यकाळात क्लबने समाजसेवा, समर्पण आणि कार्यतत्परतेची उल्लेखनीय परंपरा जपत सुमारे ₹५० लाखांहून अधिक मूल्याचे विविध समाजोपयोगी प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले. त्यांच्या या भरीव आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३१४ तसेच क्लबच्या वतीने संपूर्ण ‘पर्ल टीम’चा विशेष गौरव करण्यात आला.समारंभाला पास्ट असोसिएशन प्रेसिडेंट पुष्पा सूर्यमुर्ती प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर रोटरी क्लबचे अध्यक्ष भूषण सावे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते. इन्स्टॉलेशन चेअरमन पीपी स्वाती आणि सोनाली यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करत सोहळ्याला विशेष दिमाख प्राप्त करून दिला.यावेळी इनर व्हील क्लब ऑफ पालघरच्या ३० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेण्यात आला. क्लबच्या समाजसेवेतील सातत्यपूर्ण योगदानाचा उल्लेख करत सर्व माजी अध्यक्षांचा विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी क्लबच्या कार्याचा गौरव करत नव्या कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.“सेवेतून समाजपरिवर्तन” हे ब्रीद जपत महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकास या क्षेत्रांमध्ये अधिक वेगाने आणि व्यापक स्वरूपात काम करण्याचा निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला. गेल्या वर्षातील यशस्वी कामगिरी हीच आगामी वर्षातील अधिक मोठ्या समाजोपयोगी उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.इनर व्हील क्लब ऑफ पालघरच्या नव्या कार्यकारिणीच्या या उत्साही प्रारंभामुळे आगामी वर्षात समाजसेवेची नवी उंची गाठली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button