पालघर होलसेल मर्चंट असोसिएशनच्या निवडणुकीत प्रदीप जैन यांची निर्विरोध अध्यक्षपदी निवड; विक्रम जैन यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी

पालघर | प्रतिनिधी
द पालघर होलसेल मर्चंट असोसिएशनची निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी प्रदीप जैन यांची सर्वानुमते निर्विरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून व्यापारी बांधवांमध्ये या निवडीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन कार्यकारिणीत विक्रम पूनमचंद जैन यांची मंत्रीपदी, तर विनोद परमार आणि धर्मेश जैन यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच ख्यालीलाल चौहान यांची कोषाध्यक्षपदी आणि पंकज जैन यांची संघटन मंत्रीपदी निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

असोसिएशनच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या समस्या, त्यांच्या हक्कांचे प्रश्न तसेच व्यापारविषयक विविध अडचणी सोडविण्यासाठी नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून असोसिएशनला नवी दिशा, नवी ऊर्जा आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी अधिक भक्कम संघटनात्मक बळ मिळेल, अशी भावना उपस्थित व्यापारी बांधवांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button